Aaple Abhilekh (आपले अभिलेख) – जुना ७/१२, फेरफार, जुनी कागदपत्रे ऑनलाइन काढा.

जर का तुम्हाला जमिनीची जूनी कागदपत्रे काही कारणास्तव हवी असतील तर ती तुम्ही अत्ता घरबसल्या काढू शकता. जुनी कागद पत्रे सांबाळने हे खूप कठीण असते पण महाराष्ट्र शासनाने हि जुनी कागदपत्रे ऑनलाइन पोर्टल वर उपलब्ध करून दिली आहेत हे लेख वाचून तुम्ही काही वेळातच तुमची जुनी कागदपत्रे काढू शकता. तसेच चालू वर्षातील ७/१२ उतारा आणि इतर कागदपत्रे काढण्यासाठी महाभूलेख पोर्टल वापरा.

विषयजमिनीची जुनी कागदपत्रे (Old Land Records) जुना ७/१२, जुने फेरफार
पोर्टलAaple Abhilekh (आपले अभिलेख)
अधिकृत
वेबसाइट
aapleabhilekh.mahabhumi.gov.in

Document Availability List/ कागदपत्रे उपलब्धता यादी

(आपले अभिलेख पोर्टल वर केवळ खालील जिल्ह्यांसाठी जुनी कागदपत्रे ऑनलाइन उपलब्ध आहे)

  1. Akola / अकोला
  2. Amravati / अमरावती
  3. Dhule / धुळे
  4. Mumbai Suburban / मुुंबई उपनगर
  5. Nashik / नाशिक
  6. Palghar / पालघर
  7. Thane / ठाणे

जर का तुमचा जिल्हा या वरील यादीत नसेल तर तुम्ही तुमचा भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन जुनी कागदपत्रे काढण्यासाठी अर्ज करा.

जुना ७/१२, फेरफार Old Land Record ऑनलाइन काढा

महाराष्ट्रातील जमिनीची जुनी कागदपत्रे जसे कि जुना ७/१२, फेरफार व इतर जुनी कागदपत्रे काढण्यासाठी तुम्हाला आपले अभिलेख या पोर्टल वर जावे लागेल. या पोर्टल वर तुम्हाला जमिनीची जुनी कागदपत्रे (old land records) ऑनलाइन उपलब्ध आहे.

Step 1 – रेजिस्ट्रेशन/लॉगिन (Registration/Login) –

जर का आपले अभिलेख पोर्टल वर नवीन युजर असाल तर वैयक्तिक, राहायचा पत्ता, आणि लॉगिन ची माहिती देऊन तुम्ही रजिस्टर करा. अन्यथा जुने युजर असाल तर युजरनेम आणि पासवर्ड वापरून या पोर्टल वर लॉगिन करा.

Step 2 – दस्तावेज शोधा (Search Document) –

पोर्टल वर लॉगिन झाल्यावर Basic Search या टॅबवर जा त्यानंतर Exact Search हा पर्याय निवडून तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवडा, तुम्हाला जो दस्तावेज हवा आहे तो आणि Value निवडून Search बटनावर क्लिक करा.

Step 2 – दस्तावेज सूची (Document List) –

तुम्ही निवडलेल्या माहिती नुसार तुमच्या समोर कागदपत्रांची सूची येईल यात तुम्हाला जो दस्तावेज हवा आहे त्या समोरील Add To Cart बटनावर क्लिक करून Review Cart बटनावर क्लिक करा.

Step 4 – रिव्हिव कार्ट (Review Card) –

Review Cart या टॅब मध्ये तुम्हाला तुम्ही निवडलेला दस्तावेज दिसेल याचे तुम्हाला पुनरावलोकन करा आणि Continue बटनावर क्लीक करा. त्यांनतर तुमच्या स्क्रीनवर एक पॉपअप येईल त्यात दिलेली सूचना वाचा आणि OK बटनावर क्लिक करा.

  • पॉपअप मध्ये दिलेल्या सुचणे नुसार Download बटण सक्रिय होण्यासाठी काही वेळ लागतो यासाठी तुम्हाला काही वेळ थांबावे लागेल.

Step 5 – डाउनलोड दस्तावेज (Download Document) –

काही वेळानंतर Download बटण सक्रिय होईल दस्तावेज डाउनलोड करण्यासाठी Download Available Files या बटनावर क्लिक करून तुम्ही दस्तावेज डाउनलोड करू शकता.

शेवटी तुमच्या स्क्रीनवर तुमचा दस्तावेज येईल याला तुम्ही डाउनलोड आणि प्रिंट करू शकता. या दस्तावेज मध्ये तुम्हाला त्या वेळेची जमिनीची माहिती मिळेल.


Leave a Comment