Mahabhulekh 7/12 महाराष्ट्र भूमि अभिलेख (2023) – @ bhulekh.mahabhumi.gov.in

Mahabhulekh हे एक महाराष्ट्र राज्याचे भूमि अभिलेख ऑनलाइन पोर्टल आहे . जे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत चालवले जाते आणि या पोर्टल चे उद्देश नागरिकांना जमीन संबंधित माहिती आणि कागदपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देणे आहे.

महाभूलेख पोर्टलद्वारे नागरिक विविध प्रकारची भूमि नोंदणी ऑनलाईन पाहू शकतात, ज्यामध्ये जमिनीच्या मालकाची माहिती, भूमि नकाशे, ७/१२ उतारा, ८अ, मालमत्ता पत्रक, फेरफार आणि इतर दस्तावेज.

महाभूलेख प्लेटफॉर्म वैयक्तिकपणे खूप मदतगार सिद्ध झाले आहे कारण आता नागरिकांना सरकारी संस्था किंवा कार्यालयांमध्ये भेट देण्याची आवश्यकता कमी झाली आहे. आता नागरिक घरी बसून ऑनलाइन भूमी संबन्धित सेवांचा लाभ घेऊ शकतात.

वेबसाइट/पोर्टल Bhulekh Mahabhumi
(Mahabhulekh)
के लिये७/१२ उतारा, ८अ आणि
मालमत्ता पत्रक
द्वारा लॉन्चमहाराष्ट्र शासन
द्वारा प्रबंधितमहसूल विभाग,
महाराष्ट्र राज्य

Mahabhulekh विना स्वाक्षरीतील ७/१२ उतारा, ८अ, प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन कसे बघावे?

अधिकृत पोर्टल ला भेट द्या

महाराष्ट्र राज्याचे भूमी अभिलेख किंवा जमिनीशी संभंधित कागदपत्रे ऑनलाईन काढण्यासाठी तुम्हाला भुलेख महाभूमी (Mahabhulekh) या अधिकृत पोर्टल वर जायचे आहे. या पोर्टल वर तुम्हाला ७/१२ उतारा, ८अ, मालमत्ता पत्रक उपलब्ध करून दिले आहे.

Mahabhulekh

विभाग निवडा (Select Division)

Mahabhulekh च्या अधिकृत पोर्टल वर आल्यावर तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण ६ विभाग आहे त्यांची माहिती खालील प्रमाणे:

अमरावती विभाग (Amravati Division)Akola, Amravati, Buldana, Yavatmal, Washim
अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम
औरंगाबाद विभाग
(Aurangabad Division)
Aurangabad, Beed, Jalna, Osmanabad, Nanded, Latur, Parbhani, Hingoli
औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली
कोकण विभाग
(Kokan Vibhag)
Mumbai City, Mumbai Suburban, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
नागपूर विभाग
(Nagpur Division)
Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha
भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा
नाशिक विभाग
(Nashik Division)
Ahmednagar, Dhule. Jalgaon, Nandurbar, Nashik
अहमदनगर, धुळे. जळगाव, नंदुरबार, नाशिक
पुणे विभाग
(Pune Division)
Kolhapur, Pune, Sangli, Satara, Solapur
कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर

तुमचे शहर ज्या विभागा मध्ये येते त्या विभागाला निवडून Go या बटनावर क्लिक करा. त्या नंतर तुम्हाला त्या विभागाकडे पुनर्निर्देशित करण्यात येईल.

विना स्वाक्षरीतील ७/१२ काढण्याची प्रक्रिया

Step 1 – माहिती भरा (Enter Details) –

सर्वात अगोदर दस्तावेज मध्ये तुम्हाला ७/१२ हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवडा. ७/१२ शोधण्यासाठी तुम्हाला सर्वे नंबर/गट नंबर, अक्षरी सर्वे नंबर/गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव, संपूर्ण नाव हे पर्याय देण्यात येतील त्यातील एक पर्याय निवडून अंक प्रविष्ट करून शोधा बटनावर क्लिक करा नंतर सूची मध्ये ते निवडा आणि शेवटी भाषा निवडा, तुमचा मोबाइल नंबर भरा आणि ७/१२ पहा बटनावर क्लिक करा.

Step 2 – कॅप्टचा कोड भरा (Enter Captcha) –

७/१२ दिसण्याच्या अगोदर तुम्हाला पोर्टल तुमच्या स्क्रीनवर एक कॅप्टचा कोड देईल तो भरा आणि Verify Captcha to View 7/12 या बटनावर क्लिक करा.

Step 3 – ७/१२ बघा (View 7/12) –

शेवटी तुमच्या स्क्रीनवर तुम्ही दिलेल्या माहिती नुसार ७/१२ उतारा येईल यात तुम्हाला जमिनीच्या मालकीचे नाव, ULPIN नंबर, क्षेत्रफळ, पिकांची नोंदवही, इतर अधिकार या सर्वांची माहिती मिळते.

Mahabhulekh 7/12 Utara

विना स्वाक्षरीतील ८अ काढण्याची प्रक्रिया

Step 1 – माहिती भरा (Enter Details) –

सर्वात अगोदर दस्तावेज मध्ये तुम्हाला ८अ हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवडा. ८अ शोधण्यासाठी तुम्हाला खाता नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव, संपूर्ण नाव हे पर्याय देण्यात येतील त्यातील एक पर्याय निवडून अंक प्रविष्ट करून शोधा बटनावर क्लिक करा नंतर सूची मध्ये ते निवडा आणि शेवटी तुमचा मोबाइल नंबर भरा आणि ८अ पहा बटनावर क्लिक करा.

Step 2 – कॅप्टचा कोड भरा (Enter Captcha) –

८अ दिसण्याच्या अगोदर तुम्हाला पोर्टल तुमच्या स्क्रीनवर एक कॅप्टचा कोड देईल तो भरा आणि Verify Captcha to View 8A या बटनावर क्लिक करा.

Step 3 – ८अ बघा (View 8A) –

शेवटी तुमच्या स्क्रीनवर तुम्ही दिलेल्या माहिती नुसार ८अ येईल यात तुम्हाला जमिनीच्या मालकीचे नाव, क्षेत्रफळ, भूमापन क्रमांक, लागवडी योग्य/पोटखराबा क्षेत्र, आकारणी, दुमाला स्थानिक उपकार, टिप आणि इतर माहिती मिळते.

Mahabhulekh 8A

विना स्वाक्षरीतील मालमत्ता पत्रक काढण्याची प्रक्रिया

Step 1 – माहिती भरा (Enter Details) –

सर्वात अगोदर दस्तावेज मध्ये तुम्हाला मालमत्ता पत्रक हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवडा. मालमत्ता पत्रक शोधण्यासाठी तुम्हाला CTS No. न भू.क्रं. नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव, नाव शोधा हे पर्याय देण्यात येतील त्यातील एक पर्याय निवडून अंक प्रविष्ट करून न.भू.क्रं. शोधा बटनावर क्लिक करा नंतर सूची मध्ये तो निवडा आणि शेवटी भाषा निवडा, तुमचा मोबाइल नंबर भरून मालमत्ता पत्रक पहा बटनावर क्लिक करा.

Aurangabad Property Card

Step 2 – कॅप्टचा कोड भरा (Enter Captcha) –

मालमत्ता पत्रक दिसण्याच्या अगोदर तुम्हाला पोर्टल तुमच्या स्क्रीनवर एक कॅप्टचा कोड देईल तो भरा आणि Verify Captcha to View Property Card या बटनावर क्लिक करा.

Aurangabad Division

Step 3 – मालमत्ता पत्रक बघा (View Property Card) –

शेवटी तुमच्या स्क्रीनवर तुम्ही दिलेल्या माहिती नुसार मालमत्ता पत्रक येईल यात तुम्हाला ULPIN नंबर, धारकाचे नाव, क्षेत्रफळ, नगर भूमापन क्रमांक आणि इतर माहिती मिळते.

Mahabhulekh Property Card

Check ७/१२, ८अ आणि मालमत्ता पत्रक

Note –

विना स्वाक्षरीतील दस्तावेज ७/१२, ८अ आणि प्रॉपर्टी कार्ड हे कोणत्याही कायदेशीर आणि शासकीय कामासाठी वापरता येणार नाही.